Ganam
Jaichya Ghari Jai By G. K. Einapure
Jaichya Ghari Jai By G. K. Einapure
आपल्याला काहीही करून हातपाय हलवायला हवेत. काय तरी मार्ग दिसेल. चंद्रनाथला डॉक्टर दीप आठवला. तोंडावर नागीन उठवलेला. सातत्यानं एड्सच्या संदर्भात चर्चा करणारा. पेशंट मिळवून देण्याच्या अटीवर शाखेत येईन म्हणणारा. त्याच्याबरोबर गावात दवाखाना चालू केला तर ..?
तिकडं पुलाच्या पलिकडं दवाखाना चालू करायचा.
नंदीवाला समाज आहे. भटके लोक त्याच भागात असतात. पैसे कमी मिळाले तरी दवाखाना चांगला चालेल… आणखी सुखावह काय तरी आठवलं. आपणच स्वतःच डॉक्टर म्हणून सुरुवात केली तर? जिथं डॉक्टर पोहोचत नाहीत, तिथं कंपौंडरच डॉक्टर झाले आहेत. गडगंज पैसा मिळवायला लागले आहेत.
नऊ-दहा वर्ष आपण फुकट तर घालवली नाहीत ना!.. तसं कसं म्हणायचं? संघटना, धर्माचा प्रसार या गोष्टींसाठी… कदाचित या गोष्टी आता आपल्यासाठी तरी दुय्यम ठराव्यात.
हे काठाला लागलेलं भणंग आयुष्य धारधार झाल्यावर आणखी काय तरी करता येईल. तोपर्यंत…
या अंतरंगातली कळ भळभळू लागायची. कशाला कशाचा अर्थच नाही. कितीतरी अडचणी आहेत. आपल्याला त्या माहीत नाहीत. घरात थांबल्यावर एक-एक अडचणी येतील आपल्यापर्यंत. आपण कधीच ध्यान दिलं नाही त्याकडं म्हणून त्या समस्या सुटण्यापलिकडं गेल्या आहेत. झाडांकडं बघून जगणारा माणूस समस्यांना थोडाच भिणार! हा आपला अवघड असा कर्दनकाळ आहे. त्यातून आपण बाहेर येऊ.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.