Ganam
Jagnyachya Pasaryat By Prafulla Shiledar
Jagnyachya Pasaryat By Prafulla Shiledar
अन्यनिरपेक्ष एकाताचा आत्मम अंतःस्वर निरंतर मनात बाळगणारा कवीचा व्यावर्तक अहम् या कवितेतून ठळकपणे व्यक्त होतो. कवितेच्या अमर्याद क्षमतेवर त्याचा विश्वास आहे आणि कवितेतून जग समजून घेण्याचा त्याला हव्यास आहे. भाषेचा त्याला लळा असून लिये रिक्त अवकाश स्वरतालाने भरून काढण्याची उमेद तो बाळगतो. जगण्याच्या पसान्यात आदिम वळणांचा वारसा घेऊन आणि अनुभवांशी इमान राखून जुन्या ओळखखुणा जपतांनाच स्वतःची वेगळी वाट जेव्हा ही कविता चोखाळते तेव्हा ती अधिक अर्थसधन होते. स्वातातून, दृष्टीतून, श्रुति-स्मृतीतूनच नव्हे तर भाषेतूनही बाहेर पडून कवितेच्या गाभ्यालाच कवी मग गवसणी घालू पाहतो ऋतुचक्राचं समंजस भान पानगळीतील सर्जनाचं आश्वासन, सायबरस्पेसमधील संकेतस्थळांपासून सागरी सखोलतेपर्यंतच्या सर्व संभाव्यताचा धांडोळा, आणि त्रिमितीच्याही पार जाऊन काव्यांशी केलेला संवाद तो शब्दांत पकडतो. निरामयाची होळी करणारे हिंस्र हात, निरागसाला भेडसावणाऱ्या कृष्णसावल्या, द्वेषमत्सरानं करपणारे मानवी संबंध, आणि माणूसपणाच्या अहंकारानं कळलेलं निसर्गाचं संतुलन हे सारं काही ही कविता सामावून घेते
स्वगत या पहिल्या कवितासंग्रहाच्या बरीच पुढची मजल प्रफुल्ल शिलेदारांच्या कवितेन येथे गाठली आहे.
— भास्कर लक्ष्मण भोळे
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.