Skip to product information
1 of 1

Ganam

JAGATA JAGATA by MAHADEV MORE

JAGATA JAGATA by MAHADEV MORE

Regular price Rs. 280.00
Regular price Rs. 320.00 Sale price Rs. 280.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

या चाळीस एक व्यक्तिचित्रांतील लेखकाला भेटलेली प्रत्येक व्यक्ती म्हणजे जीवनातील भले-बुरे अनुभव सांगणारी. वैविध्याने भरलेल्या या जीवनवाटा आणि जगण्याचं भान देणार्‍या या व्यक्ती एकेका प्रकरणातून उलगडतात. शिवाजी महाराजांच्या जीवनावर ‘कादंबरी सप्तक’ लिहिणारे नीळकंठ नंदगडकर ‘वेगळा’ मधून डोकावतात. ते आग्रा-दिल्लीपर्यंत शिवप्रेम व साहित्यासाठी पायी चालण्याचा प्रयत्न करतात. ‘इनोसंट’ मधल्या निष्पाप, सहनशील मुलीला तिन्ही लग्न मनस्ताप देतात. ‘गोष्ट एका स्वामियाची’मधून ‘रणजित देसाई लेखकाला एका ग्रामीण कथेतून शाळकरी वयातच भेटतात. साहित्यवेडापायी शोकांतिका करून घेणारे आरंभशूर लेखक,तरकट व्यक्ती आणि त्यांच्या सानिध्यात होरपळणारे निष्पाप जीव यांच्या व्यथा-वेदनाही लेखक या व्यक्तिचित्रणांतून मांडतो.तसेच ‘भामट्या’,‘कोकण्या’,‘मध’,‘मास्तर’मधील व्यक्ती वेळोवेळी जगाचा न्याय उफराटा,हे शिकवतात. पटकन विश्वास कुणावर टाकू नये, हे सुद्धा या व्यक्ती सांगून जातात. म्हणूनच भविष्याचा अचूक वेध घेणारी ही व्यक्तिचित्रे आहेत, असे आवर्जून सूचित करावेसे वाटते.

View full details