Ganam
Ityadi Ityadi Kavita By Govind Purushottam Deshpande
Ityadi Ityadi Kavita By Govind Purushottam Deshpande
Couldn't load pickup availability
आधुनिक मराठी रंगभूमीवरील पहिले राजकीय नाटककार म्हणून गोविंद पुरुषोत्तम देशपांडे सर्वांना परिचित आहे. ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ या त्यांच्या पहिल्याच नाटकाने मराठी रंगभूमीला एक नवे दालन उघडून दिले. देशातील नेतृत्वाच्या सामाजिक, राजकीय, वैचारिक थिटेपणाचे चित्रण करणाऱ्या या नाटकाने एक नवा विषय जनतेसमोर मांडला. एक विशिष्ट वैचारिक जीवनसृष्टी लाभलेल्या गो. पुं.नी रचनात्मक आणि सृजनात्मक निर्मिती करण्याचा प्रयत्न आपल्या नाटकांतून केलेला आढळतो. ते जसे नाटककार म्हणून सुप्रसिद्ध तसेच राजकारण, समाजकारण, साहित्य या विषयांवर भाष्य करणारे चिंतक, मार्क्सवादी विचारवंत म्हणूनही लोकप्रिय आहेत.
राजकारणासारख्या विषयावर उत्कृष्ट नाटके लिहिणाऱ्या गो. पुं. चे अनुभवविश्व, त्यांची प्रतिभाशक्ती किती विस्तीर्ण आहे याचा प्रत्यय त्यांच्या काही कविता प्रकाशित झाल्या तेव्हा प्रथमतः लक्षात आली. गंभीर विषयांवर नाटके लिहिणारे गो. पु. देशपांडे संवेदनशील काव्यातून उलगडताना ह्या कवितेचा बाज वेगळाच आहे याचा प्रत्यय आला.
त्यांच्या लेखनप्रवासातील १९६० ते २००० या कालखंडातील विविध अनुभवांचा, यशापयशांचा संदर्भ या संग्रहातल्या कवितांना आहे. पक्के राजकीय-सामाजिक भान असलेली अशी ही प्रेमकविता आहे किंवा प्रीतीची खोल जाणीव असलेली ही राजकीय कविता आहे खरे तर दोन्हीप्रकारे या कवितेचे वर्णन करता येईल.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.