ganam
Interpretation of Dreams (Marathi) By Sigmund Freud Dr Kamlesh Soman Jivan Anandgaonkar
Interpretation of Dreams (Marathi) By Sigmund Freud Dr Kamlesh Soman Jivan Anandgaonkar
स्वप्नमीमांसा हा फ्रॉईडच्या अगदी स्वतंत्र प्रतिभेतून निर्माण झालेला एक मौलिक ग्रंथ आहे. स्वानुभवांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणे, हीच त्याकाळी मोठी नवलाईची गोष्ट होती. स्वप्नांची रचना कशी बनते, त्यांची मूळ प्रेरणा कोणत्या प्रकारची असते, हा फ्रॉईडचा प्रतिपाद्य विषयच होता. त्यासाठी त्याने अपार कष्ट घतेले. स्वप्नमीमांसेतून अनके अद्भूत व आश्चर्यकारक मनोव्यापारावर प्रकाश पडला. ईडिपस गंड हा अशाच अद्भूत मनोव्यापाराचे एक उदाहरण होय. बालकांच्या मनातील लैंगिकतेचे आकर्षण व समलिंगी जन्मदात्याबाबतची विरोधी व शत्रूत्त्वाची भावना हे वैज्ञानिकदृष्ट्या •संशोधन विचारास चालना देणारे व तेवढेच सामान्य जनांच्या रुढीबद्ध समजुतींना अनपेक्षित धक्का देणारे ठरले. यातही मानवाच्या व्यक्तिमत्त्व विकासात बाल्यावस्थेतील अनुभवांना फार मोठे स्थान असते, हेही आता निर्विवादपणे सुस्पष्ट झाले आहे.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.