Ganam
In-Between Marathi Book Unforgettable Encounters During Life's Final Moments By Hadley Vlahos
In-Between Marathi Book Unforgettable Encounters During Life's Final Moments By Hadley Vlahos
आयुष्याच्या शेवटच्या क्षणांमधल्या अविस्मरणीय भेटी इन-बिटवीनबद्दल... हे असामान्य पुस्तक मृत्यू आणि मृत्यूच्या वेळी काय होईल याबद्दल भीती दूर करण्यासाठी मदत करते. ते सांगतं की, मृत्यू हा आपल्या आत्म्याच्या विकासाचा एक नैसर्गिक भाग आहे. - लॉरा लिने जॅक्सर लेखक- न्यूयॉर्क टाईम्स बेस्टसेलर "सायन्स" सौम्य आणि परिवर्तन घडवून आणणारं पुस्तक इन-बिटवीनबद्दल आश्चर्याची गोष्ट अशी की, या पुस्तकामुळे मृत्यू ही एक शांत, गतिशील आणि पोषक घटना आहे असं जाणवतं, जी मागे राहिलेल्या लोकांचं जीवन बदलू शकते. हे पुस्तक लिहिल्याबद्दल माझ्यासारखे वाचक हेडली व्लाहोस यांचं कौतुक करतील आणि नेहमीच त्यांना यासाठी धन्यवाद देतील. - क्रिस्टी टाटे लेखक-न्यूयॉर्क बेस्टसेलर "ग्रुप" लेखिकेने करुणेच्या भावनेतून लिहिलेल्या या सुंदर पुस्तकात एक प्रकारचं शहाणपण आहे. हे पुस्तक खुल्या मनाने वाचणाऱ्या त्या प्रत्येक वाचकासाठी आहे, ज्याला चांगली कथा आवडते आणि त्यांच्यासाठी आहे, ज्यांना भीती वाटते परंतु हॉस्पस आणि जीवनाचा शेवट याबद्दल अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्याची इच्छा आहे. - केटी बटलर लेखक-न्यूयॉर्क टाइम्स बेस्टसेलर, "द आर्ट ऑफ डाइंग वेल" सौम्य आणि हृदयस्पर्शी पुस्तक. - थॅरेसा ब्राऊन, आर. एन. लेखक-न्यूयार्क बेस्टसेलर "दि शिफ्ट"
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.