Ganam
How to Win Friends and Influence People By Dale carnegi
How to Win Friends and Influence People By Dale carnegi
Couldn't load pickup availability
लक्ष वेधून घ्या, तुमच्या वरिष्ठांवर प्रभाव पाडा आणि जिथे जाल तिथे लोकांना जिंकून घ्या. ‘हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल’ (मित्र कसे जिंकावेत आणि लोकांवर कसा प्रभाव पाडावा) या पुस्तकाने हजारो वाचकांना आत्मविश्वास मिळवून देण्यात आणि आयुष्य बदलून टाकेल, अशा संधी मिळवून देण्यात मदत केली आहे आणि आता तुमची वेळ आहे.
संवादकलेवर प्रभुत्व मिळवा, तुमच्या मनातील महत्त्वाच्या कल्पना व्यक्त करा आणि आंतरराष्ट्रीय सर्वाधिक खपाचे लेखक डेल कार्नेगी यांच्या मदतीने प्रभाव पाडण्यात यशस्वी व्हा. समोरच्याशी संवाद साधल्यासारख्या त्यांच्या प्रसिद्ध अनौपचारिक पद्धतीने हे पुस्तक लिहिले गेले आहे. त्यात काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली तंत्रे रंजक पद्धतीने सांगितली आहेत. त्याचप्रमाणे प्रसिद्ध वक्ते, ऐतिहासिक व्यक्ती आणि यशस्वी नेते यांच्या आयुष्यातील गोष्टींचाही समावेश केलेला आहे.
मानवी नात्यांसंबंधात कालातीत शहाणपणा आणि सुज्ञ सल्ला देणारे हे व्यावहारिक पुस्तक तुमच्या व्यावसायिक आणि सामाजिक नात्यांच्या अवघड प्रवासातून तुम्हाला नेमकी वाट दाखवेल. त्यातून तुम्हीही तुमच्या खऱ्या क्षमतेचा शोध घेऊ शकता, अधिक काळ टिकणाऱ्या नात्यांना आकार देऊ शकता आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ‘मित्र कसे जिंकावेत आणि लोकांवर प्रभाव कसा टाकावा,’ यांबद्दलचे कौशल्य मिळवू शकता.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.