Ganam
Hitler : jhanjhavate akramanache By Pandharinath Sawant
Hitler : jhanjhavate akramanache By Pandharinath Sawant
हिटलरने पोंडवर आक्रमण करेपर्यंत त्याला ब्रिटन, फ्रान्स, रशिया यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत झाली होती हे आता लपून राहिलेलं नाही. मात्र जर्मनीने रशियावर आक्रमण केल्यानंतर १९४२ मध्ये स्टालिनग्राडच्या युद्धात हिटलरला पहिला मोठा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर जर्मनीचे लष्करी कंबरडे मोडत रशिया जर्मनीच्या पूर्व सरहद्दीवर येऊन उभा राहिला. तेव्हा १९४४ च्या जूनमध्ये युरोपच्या भूमीवर दोस्त राष्ट्रांनी प्रचंड सैन्य उतरवले व रशियाशी जुळवून घेत हिटलरचा पराभव केला. पराभवानंतर युद्धगुन्हेगार म्हणून विटंबना पत्करण्याऐवजी हिटलरने आत्महत्या केली. तेव्हा 'आपण सैतानाचा नाश केला', असा प्रचार पाश्चात्यांनी केला खरा पण दोन ओळींच्या मधला मजकूर वाचण्याचा प्रयत्न केला, तर वेगळाच ऐवज हाती लागतो. तोच पंढरीनाथ सावंत यांनी या पुस्तकातून मांडला आहे. या सगळ्या घटनाक्रमात हिटलर त्याच्या वर्तुळात कसा वागला होता, कोणाला कसा खेळवत होता हे तपशीलवार मांडणारं मराठीतलं हे पहिलं पुस्तक.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.