Ganam
Hirava Bhan By Nalesh Patil
Hirava Bhan By Nalesh Patil
Couldn't load pickup availability
कवितेच्या तळमळीने सर्जनाच्या ऊर्जेने व्यापक होत जाताना कवीची घालमेल होते, कस लागतो व शेवटी ऐरणीवर त्याची सांगता होते तिचा आस्वाद घेताना, ती किती खोलवर भिडलेय, भंडावून सोडतेय, निखळ आनंद देतेय, अस्वस्थ करतेय की अंतर्मुख करते याचाच विचार व्हावा आणि म्हणूनच ती चांगली किंवा वाईट ह्या दोनच निकषांवर दाद देऊन तिचा आस्वाद घ्यावा असं मला प्रामाणिकपणे वाटतंय, कारण कविता ही समीक्षातीत आहे असं मला नेहमीच वाटत आलंय.
ह्या हिरव्या वस्तीमधले हे प्राणवायूचे घर, मज इथे निवारा मिळतो, अन इथेच हिरवा सूर….
माझ्या हातांच्या रेषा, पानांत उमटल्या कशा पानातून कुठे निघाल्या त्या शोधीत हिरव्या दिशा? हातातून पाण्यावरती अन् पाण्यावरूनी दूर…
समीक्षेचा, टीकेचा विचार न करता, कुणाशीही स्पर्धा न करता, आपल्या आतल्या आवाजाला ‘त्या’ अंकुरासारखं फुटू द्यावं, फुलू द्यावं हीच माझी भूमिका, हेच माझं मनोगत व हेच माझं व्रत.
आपल्या ओंजळीत ही आकाशगंगा सोपवताना मला विशेष आनंद होत आहे
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.