Ganam
Heart Lamp By Banu Mushtaq Mukund Vaze
Heart Lamp By Banu Mushtaq Mukund Vaze
Couldn't load pickup availability
‘हार्ट लॅम्प’ या कथासंग्रहातील कथांत बानू मुश्ताक यांनी दक्षिण भारतातील, मुस्लीम समाजातील स्त्रिया व मुली यांचे दैनंदिन जीवन फार उत्कृष्ट रीतीने चितारले आहे. या कथा १९९० ते २०२५ या काळात कन्नड भाषेत प्रथम प्रकाशित झाल्या. या कथांतील नर्म आणि प्रसंगी कोरड्या विनोदाची बरीच प्रशंसा झाली. पत्रकारिता आणि वकिली या दोन क्षेत्रांत बानू मुश्ताक यांनी अनेक वर्षे कार्य केले, ते या कथांत दिसणाऱ्या कौटुंबिक नातेसंबंध आणि सामाजिक ताणतणाव यांच्या चित्रणांत प्रतिबिंबित होते. महिलांच्या हक्कांसाठी आणि सर्व प्रकारच्या जातीय आणि धार्मिक दमनाविरुद्ध बानू यांनी सातत्याने लढा दिला. खेळकरपणा, प्रखर असे दोष दिग्दर्शन, पारदर्शकता आणि हृदयस्पर्शिता असे अनेक शैलीविशेष त्यांच्या लेखनात एकाच वेळी दिसतात. त्यांच्या कथांतील चमकदार मुले, जहांबाज आजीबाई, विदुषकी थाटाचे मौलवी आणि लुटारू भाऊबंद, केविलवाणे पती आणि या सर्वांच्यावर साऱ्या विरोधी प्रेरणांवर मात करत आपल्या आदिम भावना जपणाऱ्या माता; या साऱ्यांतून मानवी स्वभावाचे मुश्ताक यांनी केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्ययास येते. लोक अनेक वर्षे वाचतील आणि लक्षात ठेवतील असा हा कथासंग्रह !
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.