Ganam
Haravalele Snehabandh By Narendra Chapalagavkar
Haravalele Snehabandh By Narendra Chapalagavkar
परस्परांच्या वैचारिक आकर्षणामुळे आणि आदरामुळे दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये एक बंध निर्माण होतो. हळूहळू त्याचं स्निग्ध स्नेहात रूपांतर होतं. पण काळाच्या पंजातून कोणीच सुटत नाही हे समजल्यावर मागे उरतं ते एक कोरडं व ठोक सत्य –
मनुष्यप्राणी मर्त्य आहे! तरी या स्नेहबंधांच्या स्मृती जिवंत राहतातच. एकीकडे या स्मृतींचा ओलावा डोळ्यांत हलकेच पाणी आणतो, तर दुसरीकडे या स्मृतींच्या उजेडाने जीवन संपन्न झाल्याची जाणीवही समाधान देत राहते. ज्येष्ठ लेखक नरेंद्र चपळगावकर यांनी लक्ष्मणशास्त्री जोशी, श्री. पु. भागवत, बा. भ. बोरकर, य. दि. फडके, न. र. फाटक, ग. प्र. प्रधान, अरुण टिकेकर, विंदा करंदीकर, नरसिंह राव, पी. सी. अलेक्झांडर, मंगेश पाडगावकर, शांताबाई किर्लोस्कर यांसारख्या जनमानसावर ठसा उमटवणाऱ्या काही प्रतिभावंतांच्या स्मृतींना उजाळा देणारे स्मरणलेख या संग्रहात समाविष्ट केले आहेत. या लेखांची शैली अनलंकृत, तरीही लालित्यपूर्ण असून त्यांतून या व्यक्तींचा सहवास लाभलेल्या चपळगावकरांनी मौलिक अनुभवकथन केलं आहे. लेखांमधल्या स्मृतींच्या हिरव्याकंच पानांखालून ही माणसं आपल्याला सोडून गेल्याच्या जाणिवेचा एक दुखरा झराही सतत वाहत राहतो. अनुभव समृद्ध करता करता कातर करणारा स्मरणलेखांचा संग्रह…‘हरवलेले स्नेहबंध’!
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.