Ganam
Gunhegarancha Jag By Niranjan Ghate
Gunhegarancha Jag By Niranjan Ghate
Couldn't load pickup availability
माणूस माणसाला का मारत असावा? हा प्रश्न मला अगदी लहानपणापासून सतावत आलाय. मी तीन वर्षांचा असताना माझ्या वडिलांचा खून झाला. त्यांना मारणारा खुनी कोर्टात सुटला. पुढं जेव्हा त्याचाही खून झाला तेव्हा आम्ही बंधू कुठे होतो याची चौकशी करायला पोलीस आले होते, त्यावेळी मला गंमत वाटली होती. त्या काळात मी महाविद्यालयात शिकत होतो. माझ्या मनात तेव्हाही माणूस माणसाला का मारतो, हे कुतूहल होतंच. जीवशास्त्र शिकताना कुठलाही प्राणी कारणाशिवाय सजातीय किंवा विजातीय प्राण्यास मारत नाही, हे शिकलो होतो. माणूस जीवशास्त्रीय दृष्ट्या प्राणीच ठरतो, मग तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा का वाटतो; हा प्रश्न मला पडू लागला.
सहज हाती येणारा पैसा, वेगानं होणारं शहरीकरण, दारूबंदीमुळं निर्माण झालेली परिस्थिती, शहरीकरणामुळं माणसांच्या गर्दीत राहूनही येणारी अलिप्तता आणि अनोळख यामुळं माणूस सहजगत्या गुन्हेगार बनतो असा अमेरिकन शास्त्रज्ञांनी निकर्ष काढला. वाढलेल्या पैशाला आलेली प्रतिष्ठा आणि पैसा म्हणजेच यश हे समीकरण, यातून अमेरिकेत वाढलेली गुन्हेगारी याचा उलगडाही या पुस्तकात होईल. दरम्यान गेल्या काही वर्षांत झपाट्यानं आपलं अमेरिकीकरण होऊ लागलं. भ्रष्ट राजकारणी, पोलिसांवर येणारा दबाव, पोलिसखात्यातील लाचलुचपत याही गोष्टी वृत्तपत्रांतून वाचायला मिळत असताना ज्या मार्गानं अमेरिका गेली त्या मार्गानंच आपण जाऊ नये या जाणीवेतूनच हा लेखनप्रपंच.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.