Ganam
GOPICHI DIARY- EK UNAD DIWAS by SUDHA MURTY
GOPICHI DIARY- EK UNAD DIWAS by SUDHA MURTY
Couldn't load pickup availability
"आपल्या घरच्या उबदार वातावरणातून बाहेर पडलेला गोपी रस्त्यावर भटकत असताना खूप नवनवीन अनुभवांना सामोरा जातो. त्याला रस्त्यात अनेक भटकी कुत्री भेटतात, त्यांचा जीवनसंघर्ष त्यांच्याबरोबर तोही अनुभवतो. या संपूर्ण दिवसांमध्ये गोपीला एक नवी भटकी मैत्रीण मिळते आणि त्याच्या दिवसभरातल्या अनेक कारनाम्यांमध्ये ती त्याची सोबत करते. एक दिवस असा काही विलक्षण उजाडतो, अगदी जगावेगळा! पण, गोपीला मात्र क्षणोक्षणी आपल्या आवडत्या आजीची आठवण येत असते. गोपीला आपल्या घराचा पत्ता सापडेल का? आजी आणि गोपी यांची परत भेट होईल का? ही सुंदर आणि मनाला आनंद देणारी गोष्ट वाचा, म्हणजे तुम्हाला त्याचा उलगडा होईल. सुधा मूर्तींनी आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत लिहिलेली ही कथा आबालवृद्धांचं मन नक्कीच जिंकून घेईल. रस्त्यावर भटकणार्या कुत्र्यांचं आयुष्य किती कष्टाने भरलेलं असतं, हे गोपी आपल्याला दाखवून देईल, त्याचबरोबर आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो, हेही आपल्याला त्यातून समजेल. "
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.