Ganam
Genghis Khan चंगेज खान By Jack Weatherford Mukund Vaze मुकुंद वझे
Genghis Khan चंगेज खान By Jack Weatherford Mukund Vaze मुकुंद वझे
Couldn't load pickup availability
रोमन लोकांनी चारशे वर्षांत जितकी भूमी पादाक्रांत करून जितक्या लोकांना अंकित केले त्यापेक्षा अधिक भूमी नि लोक चंगेज खान ह्याच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या सैन्याने पंचेचाळीस वर्षांत जिंकून घेतले. जिंकलेल्या प्रत्येक देशात मंगोल लोकांनी सांस्कृतिक अभिसरण व व्यापार वाढवला. त्यातून संस्कृतीला बहर आला.
आशिया आणि युरोपातील बहुसंख्य राजांच्या तुलनेत प्रागतिक असणाऱ्या चंगेज खान ह्याने जनतेची छळवणूक थांबवली, सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आणि सरंजामशाही रद्द करून परंपरागत विशेषाधिकारांना मूठमाती दिली.
एका भटक्या जमातीपासून सांस्कृतिक कल्लोळ निर्माण करणाऱ्या मंगोल साम्राज्यापर्यंतच्या आधुनिक जगाची निर्मिती कशी झाली ह्या प्रवासाची ही गाथा!
“अमंगल प्रारंभापासून इतक्या उंचीवर पोहोचणारे येशू ख्रिस्ताचा अपवाद वगळता अन्य कुणी असू शकेल, असे वाटत नाही!” – हार्पर्स
“वेदरफोर्ड ह्यांच्या जिवंत विश्लेषणामुळे मंगोल संस्कृतीचा लौकिक पुनःस्थापित झालेला आहे. अत्यंत बुद्धिमत्तापूर्ण वळसे घेत वाचकांना तपशील वैविध्याची भेट देणारे अत्यंत कसबी लेखन !” – कीर्कस रिव्ह्यूस
“वेदरफोर्ड हे विलक्षण कथाकथनकार आहेत. त्यांनी रेखाटलेले चंगेज खान ह्याचे व्यक्तिमत्त्व हे सखोल परिश्रमातून आणि गुंतागुंतीच्या तपशिलांतून निर्माण झाले आहे. वेदरफोर्ड ह्यांचे लेखन म्हणजे मंगोल साम्राज्यनिर्मात्याच्या गुणावगुणांचे उदारतेने घडवलेले दर्शन !” – मिनियापोलीस स्टार ट्रिब्यून
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.