Ganam
Gavnavari By vedika Kumarswami
Gavnavari By vedika Kumarswami
Couldn't load pickup availability
वेदिका कुमारस्वामीच्या कवितांची सुरुवात बंडखोरीने होते आणि वेगाने ती आत्मशोधाच्या टप्प्यावर येऊन पोहोचते. लोभ, मोह, हताशा, अगतिकता, मत्सर, संताप, हिंस्रता, गोंधळलेपण, परावलंबन, नियतीशरणता, आपुलकी, सखीभाव, नैराश्य, त्याग, विरक्ती असा प्रवास करत नायिका पुन्हा समंजस आसक्ती, वैचारिक स्पष्टता, भावनिक कल्लोळाचं शमन, विचारी विद्रोह, प्रगल्भ प्रेमजाणीव अशा पायऱ्या चढून आत्मशोधापर्यंत येऊन थांबते.
ती फक्त लैंगिक हिंसाचाराबाबत बोलत नाही, तर लैंगिक गरजांविषयीही बोलते, यात तिचं वेगळेपण आहे. कवितेतून कथा सांगत ती वाचकांशी बोलते आहे… चौकटींमधल्या स्त्रिया आणि चौकटीबाहेच्या स्त्रिया यांच्या जगणं, समस्या, विचार यांतल्या प्रचंड तफावतीचं दर्शन या काव्यातून घडतं.
“प्रयोगाचे खरे यश काहीतरी अजब केले यात नाही, त्यामुळेच जाणिवेचे क्षेत्र अधिक विस्तृत होते की काय यात ते आहे. यशस्वी प्रयोगामुळे काव्याची धारणाशक्ती वाढली पाहिजे.” असं गो. वि. करंदीकर यांचं मत आहे. वेदिकाच्या कवितांचा प्रयोग या निकषावर खरा उतरतो, असं निश्चित म्हणता येईल.
— अश्विनी दासेगौडा – देशपांडे
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.