Ganam
GaurdaPuran By Devdutt Pattanaik
GaurdaPuran By Devdutt Pattanaik
हिंदू आपल्या पूर्वजांना का खाऊ-पिऊ घालतात ?
• शाही कबरी उभारण्याऐवजी, ते मृतांचे दहन करण्याला प्राधान्य का देतात ?
• हिंदू धर्मातील ‘स्वर्ग’ आणि ‘नरक’ हे शब्द ‘हेवन’ आणि ‘हेल’ या शब्दांच्या समानार्थी नाहीत काय ?
अंतिम न्यायदानाच्या दिवसासारखी कल्पना हिंदू धर्मात आहे का?
• हिंदू धर्मातील जाती-पाती आणि स्त्रीत्व या संदर्भातील कल्पनांवर मृत्यूचा काय परिणाम होतो ?
• मृत्यूकडे बघण्याचा वेदांचा दृष्टीकोन हा तांत्रिकांच्या दृष्टीकोनापेक्षा भिन्न आहे का?
• भूत, पिशाच, प्रेत, पितर आणि वेताळ यांच्यात नेमका फरक काय ?
मृत्यू, पुनर्जन्म आणि अमरत्व यांबद्दलच्या धारणा हिंदू जनमानसात वेगवेगळ्या विधींच्या आणि कथा-कहाण्यांच्या माध्यमातून ठसलेल्या आहेत. मृत्यू ही केवळ दुःखद घटनाच नसून, ते एक गूढसुद्धा आहे. तो एका प्रवासाचा शेवट तर आहेच, पण त्यासोबत दुसऱ्या प्रवासाचा आरंभही आहे. जो मरण पावला तो पूजनीय आहेच; पण त्याच्या मृत्यूची घटना मात्र अशुभ आहे, अपवित्रतेचा स्रोत आहे.
गरुड पुराण आणि हिंदू धर्मातील अन्य कल्पना मृत्यू, पुनर्जन्म व अमरत्वावर या पुस्तकात मृत्यूच्या भोवताली असणाऱ्या अनेक संकल्पनांचा शोध देवदत्त पट्टनायक घेतात. त्यासाठी ते हिंदू पुराणकथांचा प्रदीर्घ पट उलगडतात आणि ज्यांची मुळे हरप्पा संस्कृतीपर्यंत जाऊन पोहोचतात, अशा प्रथांचाही धांडोळा घेतात. ‘मृत्यू’ या संकल्पनेला हिंदू धर्मात मिळणाऱ्या प्रतिक्रियेचा एकमेवाद्वितीय अभ्यास असणारे हे पुस्तक, आपण जीवनात ज्या निवडी करतो, त्यांसाठी एक ‘मार्गदर्शिका’ म्हणूनही उपयुक्त ठरते.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.