Ganam
Gadkill Ani Mi By Sangaram Indore
Gadkill Ani Mi By Sangaram Indore
Couldn't load pickup availability
छत्रपती शिवरायांच्या आणि गडकोटांच्या उत्कट प्रेमापोटीच महाराष्ट्रभर पसरलेल्या साधारण चारशे गडकोटापैकी १०१ गडकिल्ल्यांना अनेक वेळा प्रत्यक्ष भेटी देऊन, इतिहासाच्या जीर्ण कागदपत्रामध्ये दडलेला इतिहास रात्रदिवस एक करून शोधून काढून 'गडकिल्ले आणि मी हा ग्रंथ डॉ. संग्राम इंदोरे यांनी जन्माला घातला आहे. या ग्रंथातला साल्हेर हा नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र गुजरात सीमेवर उभा आहे तर पारगड कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र गोवा सीमेवर जंगलात दडला आहे. या मधल्या सह्याद्रीच्या प्रचड पसाऱ्यात बुद्धिबळाच्या पटावरच्या सैन्यांसम पसरलेल्या गडकोटांच्या अनगड वाटा आपल्याशा करणं, गडकोटांचा एकूण एक कोपरा धुंडाळणं, त्याची नोंद करणं आणि त्या गडकोटांवरील अवशेषाचे सुंदर फोटो घेणे हे अत्यंत जिकीरीचं कार्य, पण डॉक्टरांनी ते अतिशय उत्तम रित्या जमवल. त्यांच्या ओघवत्या लिखाणाला त्याच्याच सुंदर छायाचित्रांनी चार चांद लावले आहेत. जागोजागी पेरलेल्या अतिशय उत्तम स्केचेसनी आणि पेंटींगनी पुस्तकाची उंची वाढवली आहे.
गुजरात, राजस्थान, कर्नाटक, केरळमधल्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये तिथल्या सरकारी विभागानी खास बनवून घेतलेली गडकोटांची किती तरी कॉफी टेबल बुक्स आपण पाहिली असतील. पण दुर्दैवानं अखंड भारताच्या स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या महाराष्ट्रातल्या गडकोटांचं एकही कॉफी टेबल बुक आजमितीला अस्तित्वात नाही. ही कमतरता "गडकिल्ले आणि मी" या ग्रंथानं नक्कीच भरून काढली आहे एवढं नक्की.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.