Ganam
Gabhulgabha By Sadanand Deshmukh
Gabhulgabha By Sadanand Deshmukh
Couldn't load pickup availability
समाजव्यवस्थेच्या वर्तुळाचे पहिले आणि शेवटचे टोक कुटुंब असते. ते अबाधित ठेवण्यात स्त्रियांचे योगदान आदिम पातळीवरचे आहे. सृष्टीतत्त्वाशी आपले अंगभूत सृजनतत्त्वाचे नाते जोडून तिनेच पहिल्यांदा भुईच्या पोटी अन्नधान्याच्या बिजवाणाची रुजवण करून कृषिकर्माची सुरुवात केली. त्यातून मानवजातीचे स्थितिशील, विकासात्मक अवस्थेत रूपांतरण झाले. दरम्यानच्या काळात नांगराचा शोध लागल्यानंतर भुईप्रमाणेच बाईवरही पुरुषी वर्चस्वाने कुरघोडी केली, स्त्रियांना दुय्यम स्थानी ढकलून दिले. असे असले तरी ‘पिता- पती पुत्र’ या त्रिस्तरीय नातेसंबंधातून जीवनक्रमण करीत असताना तिने कष्ट, त्याग, श्रद्धा, सोशिकता आणि वात्सल्यभाव इत्यादी गुणवैशिष्ट्यांनी कुटुंबसंस्थेत; पर्यायाने समाजव्यवस्थेत काही नैतिक व सांस्कृतिक मूल्ये विकसित केली.
प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वेगवेगळ्या पातळ्यांवर होणारे शोषण, अन्याय, अत्याचार, व्यापताप सोसूनही तिच्यातील लसलसत्या जिजीविषेचे आणि कनवाळूपणाचे सामर्थ्य हे थेट रानोमाळ भुईतून उगवून सृष्टीचैतन्य टिकवून ठेवणाऱ्या झाडपिकांच्या खोडातील जिवांगाशी म्हणजे गाभुळगाभ्याशी अनुबंध साधणारे राहिले.
वर्तमान समाजव्यवस्थेत जगणाऱ्या अशाच वेगवेगळ्या स्तरातील स्त्रियांचे व्यामिश्र पातळीवरील भावविश्व रेखाटण्याचा प्रयत्न या संग्रहातील कथांमध्ये झालेला दिसून येईल.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.