Ganam
FBI By N.Chokkan
FBI By N.Chokkan
Couldn't load pickup availability
अमेरिकेच्या इतिहासात ‘फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ला एफबीआयला – एक विशेष स्थान आहे. गुन्हेगारांना शोधणे, हेरगिरीचे प्रयत्न उलथवून लावणे, दहशतवादाशी लढणे अशा गोष्टी आंतरराष्ट्रीय पातळीवर करणे आणि त्यात सन्माननीय आणि संस्मरणीय असे यश मिळवणे, यामुळे एफबीआय ही कोणालाही धाक वाटावा अशी एक प्रभावी शक्तीच आहे. अमेरिकेच्या कायदापालनाच्या इतिहासात अनेक यशोगाथांच्या स्वरूपात एफबीआयने गेली शंभर वर्षे स्वतःचे असे एक अलौकिक तेजोवलय निर्माण केले आहे.
जरा खोलात शिरून, या शक्तीचे, तेजोवलयाचे खरे अंतरंग कसे आहे हे दाखवणे हा या पुस्तकलेखनाचा हेतू आहे.
एफबीआयने मिळवलेले यश निर्विवादपणे कौतुकास्पद आहे आणि त्याचे भरपूर कौतुक झालेलेही आहे. पण ते यश संपादन करायला एफबीआयने किती प्रचंड किंमत मोजलेली आहे हे जाणून घ्यायला त्याची जरा बारकाईने पाहणी करण्याची गरज आहे. या पुस्तकात तेच केले आहे. ब्यूरोच्या शंभर वर्षांच्या प्रवासात पहिल्यापासून आजपर्यंत एफबीआयने किती गुंतागुंतीचा, उलटसुलट मतांचा, वादांचा मार्ग पार केला आहे हे या पुस्तकात दाखवले आहे.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.