Ganam
Eka Nimshaharachya Nondi By Neelesh Raghuvanshi
Eka Nimshaharachya Nondi By Neelesh Raghuvanshi
Couldn't load pickup availability
खरंतर असं दिसतंय की, लेखिकेनं या एका गावाच्या निमित्ताने जवळपास
सगळ्या उत्तर भारतीय गावांना चेहरा मिळवून दिला आहे. जरी आपण सगळे
आता छोट्या शहरात, गावात राहत नसलो तरी कधी ना कधी तिथे आपलं वास्तव्य
होतं. तिथून जाणं-येणं करत होतो. आपले किती तरी मित्र, नातेवाईक आणि सगळ्यात
महत्त्वाचं म्हणजे आठवणी आजही तिथं वसलेल्या आहेत. हिंदी लेखनातून एका
फटक्यात गाव वगळून टाका, ते मृत्यू पावेल. नीलेश रघुवंशी यांनी नि:संशय स्वत:चे
गाव जिवंत पात्रांमुळे संपन्न केलं आहे; पण त्याच्यात गती आणि जीव तेव्हाच येतो
जेव्हा गावाची सगळी दृश्यं, आवाज, रंग, गंध, स्पर्श आणि धूळ-माती जी केवळ
गावाच्या नशिबी असते तिला अल्बमच्या मुक्या सेपियापासून पडद्याच्या बोलक्या
रंगात बदलून टाकतात. इथं गाव जगलं गेलं आहे. केवळ पाहिलं किंवा काही काळ
तिथं घालवला गेलाय असं नाही. टेलिव्हिजनच्या आपल्या दीर्घ अनुभवामुळे लेखिका
स्वत:चं कौशल्य नियंत्रणात ठेवणं समजू शकते आणि वाचनीयतेच्या स्तरावर मागच्या
काही वर्षांत अशा कादंबऱ्यांचा दुष्काळच राहिला आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.