Skip to product information
1 of 2

Ganam

Dr Maria Montessori By Veena Gavankar

Dr Maria Montessori By Veena Gavankar

Regular price Rs. 260.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 260.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

डॉ. मारिया मॉंटेसरी 

इटलीतील पहिल्या महिला वैद्यक डॉक्टर. स्त्रीवादाचा जाहीर पुरस्कार करणाऱ्या. प्राचीन संकुचित सामाजिक धारणा मोडीत काढणाऱ्या.अग्रगण्य शिक्षणतज्ज्ञ म्हणून लौकिक मिळवलेल्या. बाल शिक्षणाला त्यांनी नवीन वळण दिलं. इटलीमधील झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी तयार केलेली शिक्षणप्रणाली जगभर यशस्वी ठरली.

भारतातील आपल्या दहा वर्षांच्या वास्तव्यात ‘मॉंटेसरी शिक्षणपद्धती’चा प्रसार आणि रुजवण करून त्यांनी शेकडो शिक्षक घडवले. त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी त्यांना तीन वेळा नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळालं. गिजुभाई बधेका आणि ताराबाई मोडक यांना गुरुस्थानी असणाऱ्या डॉ मारिया मॉंटेसरी यांची ही जीवन कहाणी.

 

वीणा गवाणकर या मराठीतील नावाजलेल्या लेखिका आहेत। त्यांची आजवर अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यांचा लेखनाचा मुख्य विषय असामान्य व्यक्तींचे चरित्रलेखन हा आहे।

View full details