Skip to product information
1 of 1

Ganam

Dr. Keshavrao Baliram Hedgewar By Aradhana Kulkarni

Dr. Keshavrao Baliram Hedgewar By Aradhana Kulkarni

Regular price Rs. 190.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 190.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
“आम्ही हिंदू लोक धर्मनिष्ठ आहोत, याचा आम्हांस मोठा अभिमान वाटतो; पण धर्मरक्षण व धर्मपालन यांमध्ये फरक आहे.
स्नानसंध्यादी वैयक्तिक धार्मिक आचार यथासांग करणे म्हणजे धर्मरक्षण नव्हे.
ज्यांना धर्म जगवावयाचा आहे, त्यांच्यात धर्मावरील हल्ल्यांचा प्रतिकार करण्याची शक्ती असावयास पाहिजे.
आमच्या दीन स्थितीला आम्हीच जबाबदार आहोत. हिंदुस्थानात जर धर्मभ्रष्टता पसरली असेल तर त्याला आमची वडील पिढीच जबाबदार आहे.
परकीयांचे हल्ले त्यांना दिसत नव्हते काय? आक्रमणाची वृत्ती परकीयांत बळावत आहे, याची जाणीव ठेवा. हिंदुस्थानात हिंदू समाज स्वतंत्र राहू शकतो, तो मानाने जगू शकतो, छाती पुढे व मान वर करून चालू शकतो, हा संघाचा विश्वास आहे. यासाठी लागणारी शिस्त, शील आणि संघटन यांचे शिक्षण आज पंचवीस हजारांवर तरुण लोक घेत आहेत. संघाचे लोण खेडोपाडी व प्रांतोप्रांती पोहोचले आहे. समाजाच्या ठिकाणी शक्ती, आत्मविश्वास व स्वाभिमान उत्पन्न झाला तर पंचवीस कोटी संघटित लोकांस स्वत:च्या देशात मानाने जगणे मुळीच अशक्य नाही. हा देश हिंदुस्थान म्हणून ओळखला जातो. हिंदुत्व हा या राष्ट्राचा प्राण आहे; म्हणून या देशाची, धर्माची व संस्कृतीची सर्वतोपरी जबाबदारी हिंदूंना पार पाडता यावी, ही संघाची एकच इच्छा आहे.”
– डॉ. केशवराव हेडगेवार,
चांदा शिबिरातील भाषणाचा काही अंश
डिसेंबर, 1936
View full details