Ganam
Dr. A.P.J. Abdul Kalam By Srijan Pal Singh
Dr. A.P.J. Abdul Kalam By Srijan Pal Singh
Couldn't load pickup availability
डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम हे एक प्रख्यात शास्त्रज्ञ तर होतेच; पण भारताचे राष्ट्रपती, शिक्षक व मुख्य म्हणजे एक व्यक्ती म्हणूनही ते अतिशय लोकप्रिय होते. आपली उक्ती आणि कृती या दोन्हींच्या माध्यमांतून त्यांनी मनामनात स्वतःचे विशेष असे स्थान निर्माण केले. भारतामध्ये लोकांचा इतका स्नेह व आदर मिळवणार्या त्यांच्यासारख्या अगदी मोजक्याच व्यक्ती असतील.
हे पुस्तक म्हणजे त्यांच्या प्रेरक व्यक्तिमत्त्वाला वाहिलेली आदरांजली आहे. यात त्यांच्या बालपणीचे व तरुणपणीचे, फारसे परिचित नसलेले अनेक रंजक तसेच प्रेरणादायी प्रसंग वाचायला मिळतील, ज्यांतून कलामांच्या महान व्यक्तित्वाची जडणघडण झाली.
या पुस्तकात वापरण्यात आलेल्या चित्रांच्या माध्यमातून वाचक त्यांच्या जीवनकार्याचा चैतन्यदायी अनुभव घेऊ शकतील. पुस्तकात गुंफण्यात आलेले त्यांच्या आयुष्यातील हे प्रसंग म्हणजे प्रेरणेचा अखंड स्रोतच होय.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.