Ganam
Dohakalima By G A Kulkarni
Dohakalima By G A Kulkarni
जी. ए. कुलकर्णी यांच्या निवडक कथांचा हा संग्रह. संपादक म. द. हातकणंगलेकर यांची प्रस्तावना या संग्रहाला लाभली आहे. हा संग्रह वाचताना वाचकाला जीएंच्या कथांमधून एका अनोख्या साहित्यविश्वाचे दर्शन घडते. जी. एं.नी साहित्याशी असणाऱ्या अविभाज्य निष्ठेचा आदर्श स्वतःसाठी आणि वाचकांसाठी घालून दिला. अन्य रंजक माध्यमांपेक्षा साहित्य ही वेगळी गोष्ट आहे, ती एकप्रकारची ध्यानधारणा आहे. काही प्रतिभावान प्राण्यांच्या बाबतीत तोच अलौकिक आनंदाचा आणि मोक्षाचा मार्ग आहे असा जीएंचा अनुभव होता. तो त्यांनी आपल्या कथासाहित्यातून वाचकांपर्यंत पोहचविला. जी. एं.नी कथेचा एक समावेशक आणि मूलगामी बंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला. लोककथा, बोधकथा, दृष्टांतकथा, रूपकथा, संसारकथा, मनोविश्लेषण करणारी नवकथा हे सर्व आकार आत्मसात करून आपले समृद्ध रूप सिद्ध करणारी मराठी कथा त्यांनी निर्माण केली.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.