Ganam
Dhoran Kuthavar Aale ga Bai: Rajya Mahila Dhoran: Tin Dashakancha Aadhava By Sandhya Nare-Pawar
Dhoran Kuthavar Aale ga Bai: Rajya Mahila Dhoran: Tin Dashakancha Aadhava By Sandhya Nare-Pawar
महिलांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करून ते राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य. ठरावीक कालावधीने महिलांच्या प्रश्नांची, त्यावरील अपेक्षित उपाययोजनांची चर्चा होऊन नवे धोरण अंमलात येईल, हा निर्णय १९९४ मध्ये पहिल्या महिला धोरणाद्वारे झाला. दुसरे महिला धोरण २००१मध्ये आणि तिसरे २०१३मध्ये प्रसिद्ध झाले. २०२१मध्ये चौथ्या महिला धोरणाचा मसुदा जाहीर झाला. त्यात सुधारणा करून २०२४मध्ये चौथे महिला धोरण जाहीर झाले.
पहिले महिला धोरण अंमलात आले त्याला तीन दशकं झाली आहेत. या कालावधीत आलेल्या राज्य महिला धोरणांमुळे एकूण स्त्रीजीवनात काय बदल झाला, धोरणांची अपेक्षित अंमलबजावणी झाली का, त्यात कोणत्या त्रुटी राहिल्या, आजच्या तरुण मुलींच्या आशाआकांक्षांचे प्रतिबिंब या धोरणांमध्ये उमटले आहे का, याचा सविस्तर आढावा घेऊन स्त्रियांच्या पुढच्या वाटचालीसाठी ते उपयुक्त ठरेल, आगामी महिला धोरणे कशी असावीत, याचे मार्गदर्शन व्हावे, या दृष्टिकोनातून हा पुस्तक प्रकल्प यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून साकारला आहे.
सामाजिक-राजकीय क्षेत्रात दीर्घ काळ कार्यरत असणारे कार्यकर्ते / अभ्यासक / प्रशिक्षक यांचे अभ्यासपूर्ण लेख
स्त्री प्रश्नांच्या विविध बाजूंचा सांगोपांग वेध
उपयुक्त आणि संग्राह्य दस्तऐवज
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.