Skip to product information
1 of 1

Ganam

Dainandin Prerna By Kamalesh Soman

Dainandin Prerna By Kamalesh Soman

Regular price Rs. 200.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 200.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

जीवनाचे सारे वैभव-सौंदर्य, संघर्ष, विपत्ती, दुःख, अश्रू हे सारे जाणावे आणि तरीही आपले मन साधे ठेवावे, ही एक मोठी कला आहे.

 

 

प्रत्येकाला, अगदी प्रत्येकाला दु:खाला सामोरे जावे लागतेच! आपण आपल्या अंतरंगात खोलवर जाऊन तपासले, तर आपल्याला समजून येईल की, दु:ख आपल्याला अधिक शहाणे आणि समजूतदार करते. दु:ख आपल्यातील ‘मी’पणा मिटवते. दुःख-वेदनेची आपण अबोल साथ जर स्वीकारली तर, आपण प्रेम-करुणेच्या दिशेनेही जाऊ शकतो.

 

अखेरीस दु:ख हा एक प्रकारे आपल्याला बसलेला धक्काच असतो. जी दुःखे आपण एकट्याने एकांतात भोगतो, ती आपल्या आतले अवकाश अधिक विस्तारतात.

 

जे. कृष्णमूर्ती म्हणतात, ‘दु:ख माणसाला एकटं करतं आणि इतरांपासून तोडून टाकतं! आपण या दु:खाच्या फार आहारी जाण्याचे टाळले पाहिजे. दु:ख जर अटळच असेल, तर ते सूज्ञपणे सहन करून व त्याच्या फारशा खाणाखुणा मागे न ठेवता, त्यातून बाहेर कसे पडावे, हे आपल्याला कळले पाहिजे. ज्या माणसाला अगदी जाणीवपूर्वक सुबुद्धपणे दु:ख कसे भोगायचे हे कळते, त्याला अगदी खराखुरा असा जगण्यातला परमानंद कळतो. मात्र यात दु:खापुढे नुसती मान तुकवणे किंवा दु:खाचा अपरिहार्य स्वीकार असता कामा नये. आपण दु:ख स्वीकारावे, ते सहन करावे, असे म्हणत नाही, तर त्या दु:खाबरोबर काही हालचाल न करता, काही कृती न करता राहण्याबद्दल मी बोलत आहे. त्यातून महान करुणा उपजते आणि त्या करुणेतून सर्जन घडते.’

View full details