Ganam
Common Man By Baban Minde
Common Man By Baban Minde
Couldn't load pickup availability
गरिबों के साथ आम आदमी का हाथ…
गरिबी हटाओ…
स्वातंत्र्यानंतर ‘कॉमन मॅन’ला फसवत आलेल्या या घोषणा… महात्मा गांधींच्या स्वप्नातला भारत आणि बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला भारत आज कुठे आहे? आणि या भारतात जगणारा कॉमन मॅन ? तो तर आज कमालीचा अस्वस्थ आहे. गरीबी-श्रीमंतीने भारताचे दोन तुकडे झाले आहेत. भारत आणि इंडिया. यात भरडत आहे तो भारत !
मात्र आता भारतातला कॉमन मॅन जागा होत आहे. अस्वस्थ होत आहे. राजकारणात, खेळात, सिनेमात, जाहिरातीत… आणखीही कुठे कुठे दिसणाऱ्या ढोंगी, पण आयडॉल म्हणून जगणाऱ्यांचं खरं रूप त्याच्या मनात थैमान घालतंय. मेंदू बधिर करतंय. कुत्र्या-मांजरासारखी जगणारी सर्वसामान्य माणसं आणि त्यांचं शोषण करणारा इंडिया…! इथं क्रांतीची गरज आहे… शोषणातच उद्रेकाचं बीज असतं. लाव्हा अचानक उफाळून वर येत नाही. त्याआधी जमिनीखाली अनेक घटना घडलेल्या असतात. या कादंबरीतल्या सदाशिव नारायण नवगिरेची अस्वस्थता ही त्या क्रांतीचीच तर पहिली पायरी आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.