Ganam
COMA by ROBIN COOK
COMA by ROBIN COOK
ते खाली वाकून पेशंटकडे बघत होते. भूल द्यायला कुणीच दिसत नव्हतं. आणि ऑपरेशनचं टेबलही नव्हतं. पेशंट तारांवरच झोपला होता. दोघांचं संभाषण ती कान देऊन ऐकू लागली. ``गेल्या केसचं हृदय कुठे जाणार आहे कोणास ठाऊक?`` ``सॅन फ्रान्सिस्को,`` दुसरा सर्जन म्हणाला. ``त्याचे फक्त पंचाहत्तर हजार डॉलर्स मिळणार आहेत. पण ऑर्डर घाईची होती.`` ``या किडनीचे बहुतेक दोन लाख डॉलर्स मिळतील. कारण ती चांगली मॅच होणार आहे. कदाचित थोड्याच दिवसात दुसरी किडनी लागेल.`` पहिला सर्जन म्हणाला. ``हो, पण हृदयाला मार्केट मिळाल्याशिवाय ती देता कामा नये.`` ``दलासमधल्या मुलाला योग्य किडनी मिळाली तर दहा लाखाची ऑफर आहे. त्याचे वडील तेल उद्योगात आहेत.`` दुस-या सर्जननं शीळ वाजवली. ``मग काही प्रगती?`` ``पुढच्या शुक्रवारी मेमोरियलमध्ये एक ऑपरेशन आहे; बघू या किती मॅच होते.``
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.