Ganam
CHUTKYACHYA GOSHTI by D.M.MIRASDAR
CHUTKYACHYA GOSHTI by D.M.MIRASDAR
गावात आलेल्या भोंदू "महाराजा`ची साक्ष शिवा जमदाडेबाबत खरी ठरते, तेव्हा... घरात शिरलेल्या चोरांना एक " धोरण` ठरवून रामभाऊ किल्ल्या देतात, तेव्हा... गावाचा "विकास` करायला विकासयोजना अ¬धिकारी नकार देतो, तेव्हा... अपघातात सापडलेल्या तलाठ्याविषयी गावकऱ्यांना वाटणारी "हळहळ` तिरस्कारात बदलते, तेव्हा... पैज लावणाऱ्या दामूची फजिती होते अन् ती त्याच्या जीवावर बेतते, तेव्हा... बायको आजारी पडावी यासाठी खटाटोप करणाऱ्या नवऱ्याच्या प्रयत्नांना यश येते, तेव्हा... पारावरच्या पाटलांची थाप खरी ठरते, तेव्हा... ग्रामसु¬धार योजनेच्या माध्यमातून शाळेची "प्रगती` होते, तेव्हा... "हेळातील भीषण प्रकार` पोरखेळ ठरतो, तेहा... भविष्य बघण्याचा "नाद` असलेल्या दत्तूचं भविष्य खरं ठरतं, तेव्हा.... द. मां. च्या "चुटक्याच्या गोष्टी` मधून मानवी स्वभावाचे विवि¬ध पैलू आपल्या समोर येतात. त्यातील काही आपल्याला अंतर्मुख करतात... तर काही हसवतात...
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.