Ganam
Chhatrapati Sambhaji : Jeevan Ani Balidan By Medha Deshmukh - Bhaskaran
Chhatrapati Sambhaji : Jeevan Ani Balidan By Medha Deshmukh - Bhaskaran
Couldn't load pickup availability
'अपराजित योद्धा', 'मृत्युंजय' अशी ऐतिहासिक प्रतिमा असलेल्या शंभूराजांना उणेपुराणे ३२ वर्षांचे आयुष्य लाभले...
त्यात आईविना हरवलेले बालपण... अवघ्या नवव्या वर्षी स्वीकारावी लागलेली मोगलांची मनसबदारी... आग्र्यातील सुटकेनंतर मथुरेत राहताना वाट्याला आलेले एकाकीपण... अशा कितीतरी अघटित, असामान्य घटना शंभूराजांच्याबाबत घडल्या! अगदी लहान वयातच ते मराठा व मोगलांच्या संघर्षात ओढले गेले.
त्यांचे 'युवराज'पद हेही गृहकलह आणि अष्टप्रधानमंडळाचा विरोध यांमुळे काटेरी मुकुटच ठरले...
शिवाजीमहाराजांच्या अकाली मृत्यूनंतर मोगल साम्राज्यातील सर्वांत क्रूर बादशहा औरंगजेब लाखो गुलाम आणि करोडोंच्या खजिन्यासह स्वराज्यावर चालून आला. तब्बल नऊ वर्षे शंभूराजांनी औंरंगजेब, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी, डच, फ्रेंच यांच्यापासून रयतेचे रक्षण केले, एक किल्लाही शत्रूला जिंकू दिला नाही...
छत्रपती शिवाजीमहाराजांनाही अशा तऱ्हेने प्रचंड मोठ्या मोगल सैन्याशी लढण्याची वेळ आली नव्हती...
इतिहासाने संभाजीराजांवर अन्याय केला... परंतु शंभूराजांनी मराठा योद्ध्यांच्या अनेक पिढ्यांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुलिंग पेटत ठेवले, हे नाकारता येणार नाही.
...संभाजीराजांच्या या व्यामिश्र व्यक्तिमत्त्वाचे भावनिक तसेच तत्कालीन ऐतिहासिक, राजकीय संदर्भ मांडणारी कादंबरी!
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.