Ganam
Chala Todha Comansense Vaparuya By Dr. P.V. Vaidyanathan Dhanashree Bhate
Chala Todha Comansense Vaparuya By Dr. P.V. Vaidyanathan Dhanashree Bhate
बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, कल्पनाशक्ती आणि विश्लेषणसामर्थ्य अशा अनेकांनी समृद्ध असलेले आपण मनुष्यप्राणी आपण आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये साधा कॉमनसेन्स का बरं नाही वापरू शकत?
तुम्ही कधी स्वतःला हे प्रश्न विचारले आहेत का....
आपण का वैतागतो? आपल्याला राग नक्की कशाचा येतो? आपल्या मनात अपराधीपणाची भावना का निर्माण होते ?
आपण खोटे का बोलतो? कधी विनाकारण बचावात्मक पवित्रा का घेतो? लोकांचा एकमेकांवर विश्वास का नसतो ? स्वतःला जसे आहोत तसे स्वीकारण्यासाठी आपल्याला धडपड का करावी लागते:
बरेचदा आपण आपले आयुष्य गुंतागुंतीचे का करून ठेवतो ? आपण एखाद्यावर टीका करण्यात तत्पर असतो, पण त्यासंदर्भात त्या व्यक्तीशी स्पष्ट संभाषण मात्र आपण कटाक्षाने टाळतो. असे का?
खरे तर निव्वळ कॉमनसेन्स वापरुन आपण आपल्या समोरील परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. हे पुस्तक, आपल्याला सर्वपरिचित अशा दैनंदिन परिस्थिती आणि घटनांकडे अधिक डोळसपणे पाहायला शिकवते. फक्त आपला दृष्टिकोन बदलून आणि थोडासा कॉमनसेन्स वापरून आपण आपल्या समस्या कशा सोडव शकतो, किंवा निदान कमी करू शकतो यावर हे पुस्तक प्रकाश टाकते. जीवनातील आनंद हिरावून घेणा-या राग, निराशा, पश्चात्ताप, शोक, चिडचिड, दुःख आणि नैराश्य यांसारख्या नकारात्मक भावनांना दूर ठेवायला शिकविणारे एक साधेसोपे सहज आचरणात आणण्याजोगे मार्गदर्शक म्हणून हे पुस्तक काम करते.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.