Skip to product information
1 of 1

Ganam

Chahoor By Sameer Gaikwad

Chahoor By Sameer Gaikwad

Regular price Rs. 280.00
Regular price Rs. 330.00 Sale price Rs. 280.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

खरंतर आभाळाचंही गणगोत मातीतच असतं

पाऊलवाटांचा आसरा घेत आभाळ मातीत उतरतं!

लेखक, कवी त्याला पावसाचं नाव देतो.

पण पाऊस म्हणजे तरी काय असतो?

वाडवडलांचा सांगावा आभाळातून घेऊन येणारा 

तो आपलाच एक ‘भाऊबंद’ असतो.

त्यांच्या आनंदाश्रूंचा खारट थेंब असतो!

म्हणूनच सारं चराचर व्याकूळ होऊन पावसाची 

चातकासारखी प्रतीक्षा करत असतं.

ऋतू कोणताही असो त्यातील पर्जन्योत्सुक नभातलं ओझं 

हळूहळू रितं होत जातं, वसुंधरा तृप्त होते. ही तृप्ती सारस्वतांच्या 

लेखणीला उभारी देते, त्यात इंद्रधनुष्यी रंग भरते.

मग आयुष्याच्या नागमोडी पाऊलवाटांचा प्रवास अक्षरगंधाने 

भारून जातो, बघता बघता साठा उत्तराची शब्दकहाणी सुफळ होते.

इतकी जादू एका पावसाने होते!

पर्जन्यकाळातील आभाळगाण्यांची ही ताकद अनोखी आणि 

अभूतपूर्व असते!...” अशा नोंदी म्हणजे जणू आभाळमायेच्या 

काळीजखुणाच होत,

ज्या ‘चाहूर’मध्ये पानोपानी विखुरल्या आहेत.

View full details