Ganam
Careercha 'B' Plan By Dr. Shreeram Geet
Careercha 'B' Plan By Dr. Shreeram Geet
Couldn't load pickup availability
मुला-मुलींनी दहावीच्या वर्गात प्रवेश घेतला
की लगेचच घरात त्यांच्या करिअरची चर्चा सुरू होते.
अमक्याच्या मुलाने तमकं केलं, आज तो एवढं कमवतोय.
माझं हे स्वप्न होतं ते आता मुलाने पूर्ण करावं...
वगैरे वगैरे अशा विविध अपेक्षांचं ओझं घेऊन
मुलं आपलं शिक्षण पूर्ण करत असतात.
पण त्यांना स्वत:ला नेमकं काय हवं आहे
हे विचारण्याच्या फंदात सहसा कोणी पालक पडत नाही.
परिणामी इच्छेविरुद्ध निवडलेला करिअरचा मार्ग
बहुतांश मुलांच्या पदरात अपयश टाकतो
आणि मग ‘नालायक’ हा शिक्का कपाळावर मिरवत
त्याला आयुष्य पुढे ढकलत जगावं लागतं.
हे सारं टाळायचं असेल, तर तुमच्या आवडी,
क्षमता आणि मूल्य यांचा सारासार विचार करून
करिअरचा योग्य तो मार्ग निवडावा.
तुम्हाला सर्वाधिक काय आवडतं, तुम्ही कोणत्या क्षेत्रात
अधिक चांगलं काम करू शकता,
म्हणजे तुमच्याकडे अंगभूत असलेलं कौशल्य कोणतं आहे
आणि तुम्ही बाळगलेली मूल्यं काय आहेत
हे जर विचारात घेऊन करिअर निवडलं तर
यशाचे अनेक षट्कार तुमच्या आयुष्याचे भाग बनतील.
या पुस्तकात दिलेल्या करिअरच्या सक्सेस स्टोरीज तुम्हाला
हेच सांगतील. किंबहुना त्या तुम्हाला
योग्य करिअर निवडण्याबाबत तुमच्यासाठीचा
नेमका मार्गही दाखवतील.
तेव्हा हे पुस्तक एकदा तरी वाचायलाच हवं!
Careercha 'B' Plan | Dr. Shreeram Geet
करिअरचा ‘बी’ प्लान । डॉ. श्रीराम गीत
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.