Ganam
Career Mantra By Jeevan Muley
Career Mantra By Jeevan Muley
सुयोग्य करिअर निवडणं… प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य टप्पा…
अगदी बालवर्गात पाऊल ठेवल्यापासून नकळतपणे आपल्या करिअरची पायाभरणी सुरू असते. दहावी-बारावीच्या निर्णायक वळणावर आपल्याला आपली नेमकी दिशा ठरवावी लागते आणि त्या क्षणी सर्वांत महत्त्वाचे असते ते विवेकी मार्गदर्शन. कारण करिअरच्या पायावरच आपल्या यशस्वी जीवनाची इमारत उभी असते.
हेच मार्गदर्शन करत असंख्य वाटांमधून स्वतःची वाट शोधण्यासाठी आपली मानसिक बैठक घडवणारे आणि त्या अनुषंगाने या प्रदीर्घ पण आवश्यक अशा प्रक्रियेची संपूर्ण माहिती देणारे हे पुस्तक. प्रत्येकाची आवडनिवड, कुवत, संधी इत्यादी अनेकविध पैलू असलेला करिअरचा विषय यात सविस्तरपणे मांडला आहेच; पण त्याबरोबरच शैक्षणिक अर्हता मिळवल्यानंतर मुलाखतीमध्ये स्वतःचा ठसा उमटवत नोकरी किंवा व्यावसायिक जगामध्ये कसे पदार्पण करावे हेही इथे मुद्देसूदपणे सांगितले आहे.
करिअरचा शोध घेऊ पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला, शिक्षण मिळवल्यानंतर व्यावसायिक जगतात पाऊल ठेवू पाहणाऱ्या असंख्य नवतरुणांना आणि आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न पाहणाऱ्या पालकवर्गाला हे पुस्तक निश्चितपणे अत्यंत उपयुक्त ठरू शकेल.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.