Ganam
Bhoomkal By Madhav Sarkunde
Bhoomkal By Madhav Sarkunde
Couldn't load pickup availability
सरकारी धोरणांमुळे होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आदिवासी समूहांनी
पुकारलेलं बंड म्हणजे भूमकाल. बस्तर संस्थानातील आदिवासींनी
1910 मध्ये ब्रिटिश सरकारविरुद्ध असं बंड पुकारलं होतं. ते भूमकाल
आंदोलन म्हणून प्रसिद्ध आहे. अर्थात पारतंत्र्यातून मुक्त झाल्यानंतरही
आदिवासींचा हा भूमकाल (संघर्ष) अद्याप संपलेला नाही.
नैसर्गिक साधनसंपत्तीवर सरकारचा हक्क या न्यायाने केला जाणारा
अन्याय तर आदिवासींना सहन करावा लागतोच आहे, पण त्याचबरोबरीने
व्यक्तिगत जीवनातही गरिबी आणि त्यातून येणारी अभावग्रस्तता आणि
अशा अभावग्रस्ततेतही शिक्षणाला प्राधान्य देत स्वत:ची वेगळी वाट
शोधणाऱ्यांनाही समाजव्यवस्थेबरोबर विविध पातळ्यांवर संघर्षरत राहावं
लागत आहे.
अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत ज्यांनी चिकाटीने शिक्षण पूर्ण केलं आणि
इंग्रजी विषयाचे प्रोफेसर बनले त्या माधव सरकुंडे यांनाही व्यक्तिगत आणि
सामाजिक जीवनात भूमकाल करावा लागला. त्याचीच ही गोष्ट आहे, जी
आदिवासींच्या वेगळ्या विश्वात घेऊन जाते आणि समाजाचं वर्तन कसं
दुटप्पी असतं याचंही दर्शन घडवते.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.