Ganam
Bharatiya Dharmasangit By Keshavchaitanya Kunte
Bharatiya Dharmasangit By Keshavchaitanya Kunte
भारतात कलासंगीत, लोकसंगीत आणि जनसंगीत ह्या तीन कोटींबद्दल पुष्कळ बोललं, लिहिलं जातं, मात्र धर्मसंगीत हा विषय तुलनेत फारसा हाताळला जात नाही. या पुस्तकाच्या निमित्ताने केशवचैतन्य कुंटे यांनी धर्मसंगीताची चर्चा केली आहे.
भारतातल्या धर्म आणि संगीताच्या सुरेल ताण्याबाण्याचं ऐश्वर्य अधोरेखित करणाऱ्या ‘धर्मसंगीता’चं आख्यान कुंटे यांनी या पुस्तकात लावलं आहे. धर्म, इतिहास आणि संस्कृती यांचे धागेदोरे जुळवत संगीताचा सुंदर पट या पुस्तकात कुंटे यांनी उलगडला आहे. पुस्तकातले पहिले सात लेख हे धर्मसंगीताची सैद्धांतिक बाजू स्पष्ट करणारे आहेत तर, पुढील लेख हे विशिष्ट धर्म, संप्रदाय यांतील संगीताचं वर्णन करणारे आहेत. विषय समजावून देताना ज्या गीतांचा, संगीताचा उल्लेख त्यांनी केला आहे त्यांचे QR Code पुस्तकात त्या त्या ठिकाणी दिले आहेत. ते स्कॅन करून वाचकांना ती गीतं, संगीत यांचा प्रत्यक्ष आस्वाद घेता येतो. पुस्तकात दिलेली अनेक चित्रं, रेखाटनं, फोटो हे विषय समजून घेण्यास उपयुक्त आहेत.
भारतीय धर्मसंगीत हा अत्यंत व्यापक विषय आहे आणि कोणत्याही एकाच पुस्तकात तो संपूर्णपणे आणि समाधानकारक रीत्या हाताळला जाण्याचा संभव नाही. या पुस्तकात भारतीय संगीताचे सगळेच पैलू उलगडले नसले तरी हे पुस्तक संगीताच्या अभ्यासकांना ‘धर्मसंगीत’ ह्या संगीतकोटीची व विविध धर्मसंगीत परंपरांची तोंडओळख करून देण्यास समर्थ ठरेल. या पुस्तकामुळे अन्य संगीत अभ्यासकांना धर्मसंगीतविषयक अधिक प्रगत अभ्यासाकडे वळवण्यास प्रोत्साहन मिळेल.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.