Ganam
Bharatatil Pramukh Dharma By Dr. Sharad Abhyankar
Bharatatil Pramukh Dharma By Dr. Sharad Abhyankar
Couldn't load pickup availability
जगाच्या पाठीवरही आपल्याला विविध धर्म आढळून येतात. त्या सर्व धर्मांची
आपली म्हणून मानली जाणारी काही वैशिष्ट्ये आहेत, स्वतंत्र अशा काही
रूढी-परंपरा आहेत. पण त्याबद्दल आपण सारेच अगदी बारकाईने जाणून
घेतो असे नाही. किंबहुना इतर धर्माबद्दल आपल्या मनात गैरसमज मात्र भरपूर असतात.
त्या गैरसमजातून धर्मद्वेष वाढीस लागतो. तो अंतिमत: आपल्या भारतीयत्वाच्या
भावनेला, एकात्मतेला, बंधुभावाला धक्का देणारा ठरतो. अलीकडे तर धर्माच्या
नावाने केले जाणारे राजकारण हा अतिशय गंभीर आणि चिंताजनक मुद्दा ठरू
लागला आहे.
धर्मद्वेषाद्वारे आपला राजकीय स्वार्थ साधण्याचे प्रयत्न आवर्जून केले जात आहेत.
अशा स्थितीत आम्ही सारे प्रथम भारतीय आहोत, ही भावना मनामनात रुजविणे
ही काळाची गरज आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनीही धर्माच्या पलीकडे जगाला
मानवतेची शिकवण दिली आहे.
या पार्श्वभूमीवर ‘भारतातील प्रमुख धर्म : सच्च्या भूमिकेतून घडवलेला धर्मपरिचय'
हे डॉ. शरद अभ्यंकर यांचे पुस्तक विविध धर्मांविषयी सत्य मांडण्याच्या दृष्टीने
अत्यंत महत्त्वाचे आहे.
- डॉ. कुमार सप्तर्षी
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.