Ganam
Bharatache Rashtrapati Ani Pantpradhan By Pratibha Hamras
Bharatache Rashtrapati Ani Pantpradhan By Pratibha Hamras
Couldn't load pickup availability
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लवकरच देशाने संसदीय कार्यपद्धतीचा स्वीकार केला. राष्ट्रपती व पंतप्रधान ही देशाच्या प्रशासकीय प्रणालीतील दोन सर्वोच्च पदे आहेत. घटनात्मकदृष्ट्या आत्यंतिक महत्त्वपूर्ण असलेल्या या पदांवर आजपर्यंत कित्येक माननीय व्यक्तींनी उत्तुंग कार्य केले आहे.
देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारे निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्या या पदांना जसे राजकीय महत्त्व असते तशीच ती देशातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासही कटिबद्ध असतात.
याच अनुषंगाने देशाच्या वर्तमान आणि भविष्यात दूरगामी बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य असलेली ही पदे ज्या व्यक्तींनी भूषविली त्यांच्या जीवनाचा संक्षिप्त आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. विद्यार्थी, शिक्षक, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार, राजकीय क्षेत्राची आवड असलेल्या व्यक्ती आणि सर्वसामान्य वाचक यांनी निश्चितपणे वाचले पाहिजे असे हे पुस्तक आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.