Ganam
Bharatache Natyashastra : Marathi Bhashantar By Saroj Deshpande
Bharatache Natyashastra : Marathi Bhashantar By Saroj Deshpande
नाट्यशास्त्र हा रंगभूमीबद्दलचा प्राचीन भारतातील संस्कृत ग्रंथ १९२६ ते १९५६ या काळात टप्प्याटप्प्याने प्रथम प्रकाशात आला. पण अद्याप मराठीमध्ये त्याच्या छत्तीसपैकी संगीताचे काही व इतर पाच अध्यायांचेच भाषांतर उपलब्ध आहे. प्रस्तुत पुस्तकामध्ये सत्तावीस अध्यायांचे संपादित मराठी भाषांतर व विवेचन आहे. नाट्यशास्त्र या ग्रंथातील नाटकावरील अध्यायातील गाभ्याचा विस्तृतपणे व साकल्याने मांडणारा भाग या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे. संगीतावरील अध्याय वगळले आहेत आणि नृत्यावरल्या अध्यायांमधल्या तपशिलांची वानगीदाखल दखल घेत उपयोजनांबद्दलच्या मर्मदृष्टी नोंदवल्या आहेत. रंगकर्मींना आणि रसिक जिज्ञासूंना मूळ ग्रंथाचा आवाका आणि सखोलता या संपादनातून प्रतीत होतील तसेच मूळ संहितेशी प्रामाणिक राहून सुबोध मराठी वळण भाषांतरात उतरेल याची दक्षता घेतली आहे हेही जाणवेल. ‘भरताचे नाट्यशास्त्र : मराठी भाषांतर’ हे पुस्तक संस्कृततज्ज्ञ आणि नाट्यशास्त्र मर्मज्ञ सरोज देशपांडे यांच्या सूक्ष्म वाचनाचे आणि अपार मेहनतीचे फळ आहे.” – राजीव नाईक नाटककार व नाट्यसमीक्षक
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.