Skip to product information
1 of 1

bookganga

Bharat Mazya Najaretoon - भारत माझ्या नजरेतून By Kobbi Shoshani, Gauri Joshi कोबी शोशानी गौरी जोशी

Bharat Mazya Najaretoon - भारत माझ्या नजरेतून By Kobbi Shoshani, Gauri Joshi कोबी शोशानी गौरी जोशी

Regular price Rs. 268.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 268.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

'माझ्या मुंबईतील चार वर्षांच्या वास्तव्यादरम्यान वैयक्तिक आणि व्यावसायिक अनुभवांनी मला हे स्पष्टपणे जाणवले की अनेक अर्थानी भारत हा इस्रायली समाज आणि राजकारणाचे ऐतिहासिक प्रतिबिंब आहे. एका प्रकारे भारताने माझ्या वैयक्तिक जीवनकथेवरही प्रभाव टाकला. हे पुस्तक केवळ भारताविषयी नाही तर यातील अनेक पैलू इस्रायलच्या इतिहासाशी आणि आजच्या वास्तवाशीही प्रतिध्वनित होतात.
हे पुस्तक १९७० च्या दशकात, सात प्राचीन दरवाज्यांचे शहर असलेल्या जेरुसलेममध्ये सुरू झालेल्या प्रवासाचे कथन करते आणि भारताची बहुसांस्कृतिक, व्यावसायिक राजधानी असलेल्या मुंबईत येऊन संपते.'
कोबी शोशानी हे २०२१-२५ या कालावधीत विविध देशांच्या मुंबईस्थित काँसुल जनरलपैकी सर्वात लोकप्रिय राजनयिक अधिकारी म्हणून ओळखले जायचे. भारताचा इतिहास किंवा राजकारण याबाबत औपचारिक शिक्षण झाले नसताना त्यांनी मुंबईतील विविध पक्षांचे नेते, उद्योगपती, विचारवंत, बॉलिवूड तारे-तारका आणि कलाकारांशी जोडलेल्या मैत्रीतून त्यांना झालेले बदलत्या भारताचे आकलन आणि अवघ्या ९ महिन्यांच्या अंतराने स्वतंत्र झालेल्या भारत आणि इस्रायलमधील साम्यस्थळे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
आपल्या मनात इस्रायलचे जे चित्र असते ते झूम इन करून इस्रायली समाज आणि राजकारणातील खाच खळगे दाखवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मूळ पुस्तक हिब्रू भाषेत आणि मुख्यतः इस्रायली वाचकांना भारताची नव्याने ओळख करून देण्यासाठी लिहिले असले तरी त्याचे मराठीतील भाषांतर वाचकांना मुंबईत राहणाऱ्या एका राजनयिक अधिकाऱ्याचे जीवन कसे असते आणि ते भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटनांकडे तसेच राजकीय घडामोडींकडे कशा पद्धतीने पाहतात हे अवगत करून देते.

View full details