Ganam
BHARARI By J. M. Abhyankar
BHARARI By J. M. Abhyankar
आपल्याला आयुष्यात अशी माणसं थोडीच भेटतात की जी त्यांचा दृढनिश्चय आणि धैर्य यांमुळे लक्षणीय वाटतात. श्री. ज. मो. अभ्यंकर हे असेच एक गृहस्थ आहेत. त्यांना ओळखणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांचे ते प्रेरणास्रोत होते.
जीवनाचा प्रारंभ अशा सामान्य परिस्थितीत झाला असतानाही ते ध्येयापासून परावृत्त झाले नाहीत. कितीही संकटांचे डोंगर मार्गात आडवे आले, तरीही यशस्वी व्हायचंच या प्रेरणेने ते झपाटलेले होते. त्यांच्या दृढनिश्चयाच्या जोरावरच ते लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसले. अथक परिश्रम करण्याची वृत्ती आणि गुणवत्ता यामुळेच ते महाराष्ट्र शिक्षण सेवा खात्यात प्रवेश मिळविण्यात यशस्वी झाले. त्यानंतर अभ्यंकरांनी अनेक पदं भूषविली आणि मौलिक कार्य केलं. महाराष्ट्राला दर्जेदार शिक्षण मिळाव म्हणून ते सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांची मदत घेतली गेली.
1 त्यांच्या चित्तथरारक जीवनप्रवासाची ही कथा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जे मार्गक्रमण करू इच्छित असतील, त्यांच्यासाठी उत्तम जीवनपथाचा नकाशा ठरेल.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.