Ganam
Beiman By Vasant Kanitakar
Beiman By Vasant Kanitakar
ज्याँ आनुई या फ्रेंच नाटककाराने ‘बेकेट’ ह्या आपल्या नाटकात मित्रप्रेमाचे जे वेधक चित्र रंगविले आहे त्याचे प्रतिबिंब इतर भाषांप्रमाणे मराठीतही उमटले आहे. ‘बेकेट’ चे भाषांतर वि. वा. शिरवाडकर यांनी केले, तर वसंत कानेटकर यांच्या ‘बेइमान’ चे उगमस्थान तिथेच सापडेल.
उद्योगपती धनराज याला आपला बालमित्र चंदर याच्याबद्दल वाटणारे अपार प्रेम आणि आपल्याच सूचनेवरून चंदरने कामगारांचे नेतृत्व स्वीकारल्यावर दोघांमधे निर्माण झालेला संघर्ष हा या नाटकाचा केंद्रबिंदू. धनराज चंदरमधे आपले स्वरूप प्रकर्षाने पाहतो. आपले गुणदोष तो अधिक रेखीव स्वरूपात चंदरमधे शोधीत असतो. म्हणूनच याचे आत्मप्रेम आणि स्वतः विषयीचा तिटकारा याचे पर्यवसान चंदरवरील प्रेम-द्वेष अशा दुहेरी संबंधात होते हा या नाटकाचा विलोभनीय विशेष.
नाटकाची रचना, संवाद आणि पात्रांचा विकास ह्या सर्व बाबतीत कानेटकर यशस्वी आहेतच. ह्या नाटकाला मालक-मजूर संबंधाची पार्श्वभूमी लाभल्यामुळे वेगळेच परिणाम लाभले आहे.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.