Skip to product information
1 of 1

Ganam

BATTASHI by MAHADEO MORE

BATTASHI by MAHADEO MORE

Regular price Rs. 100.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 100.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
‘बत्ताशी’ कथेतील मांग-गारुडी समाजातील बत्ताशी ही हवालदार् याची बायको. एकदा हवालदार्या भाजतो आणि त्यावरून शंका घेतली जाते बत्ताशीवर. बत्ताशी माहेरी निघून जाते. फकिर्याला लग्न करायचंय बत्ताशीशी. काय होतं पुढे? ‘छडीटांग’ कथेतील शारीचा बाप तिच्या लग्नाचा बाजार मांडून पैसे कमवत असतो; पण शारी मारते त्याला टांग. ‘वस्ती’मधून साकारतं वस्तीवरील माणसांचं भावव्यामिश्र चित्र. एकटेपणाची व्यथा सोसत जगणारा मोडक्या गोपाळा भेटतो ‘मोडक्या गोपाळा’ या कथेत. ‘भूल’ कथेतील जानू पहिलवानकीच्या नादाने बायकोपासून राहतो दूर; पण बायकोच्या चारित्र्याचा येतो त्याला संशय. त्या संशयातूनच त्याच्या हातून होतो खून. ‘अकुलवंती’ कथेतील तरुण एका दारुड्याने कान भरल्यावर प्रेमिकेला दूर लोटतो आणि नंतर पस्तावतो. ‘जोगतीण’ कथेतील तिचा प्रवास होतो तो देवदासी ते वेश्या असा; पण त्या कर्दमातून कथानायक तिला बाहेर काढू शकत नसतो...माणसाच्या विकारांचं, त्याच्या अवतीभवतीच्या समाजाचं, वातावरणाचं वास्तव चित्रण करणार्या अस्सल कथांचा संग्रह. महादेव मोरे यांच्या ग्रामीण पार्श्वभूमीवरील व्यामिश्र कथा.
View full details