Skip to product information
1 of 1

Ganam

Bali By Anjali Daskhedkar

Bali By Anjali Daskhedkar

Regular price Rs. 299.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 299.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

बळी म्हणजे केवळ चक्रवर्ती सम्राट नव्हे, तर त्रैलोक्यावर अधिराज्य गाजवलेला आणि प्रजेने काळजात चिरकाळ जपून ठेवलेला चिरंजीवी राजा! न्याय, प्रेम आणि समृद्धीने त्रैलोक्य उजळून टाकणारा दानवीर ! महाबली बळी राजा नेमका कोण होता? दानशीलतेचे सर्वोच्च शिखर गाठणारा बळी राजा नेमका कसा होता ? युद्धात त्याचा पराक्रम विजेसारखा झळाळत होता.. सभेत त्याचा विचार समुद्रासारखा खोल होता.. आणि त्याचे प्रजेवरचे प्रेम वसंतासारखे बहरलेले होते. परंतु त्याच्या ह्या भव्यतेच्या आड दडले होते; संघर्ष, विश्वासघात आणि नियतीचे खेळ. बळी राजाचे हृदय जितके विशाल होते, तितकेच हळवेही होते. प्रेम, मैत्री, नातेसंबंध ह्यांच्यात संतुलन राखणारा हा राजा शेवटी कोणत्या निर्णायक क्षणी नियतीसमोर नतमस्तक झाला ? आजही ‘इडा पीडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे!’ असे आपण म्हणतो, ते बळीचे राज्य नेमके कसे होते ? बळीच्या राज्याच्या अद्वितीय काळाचे जिवंत दर्शन ह्या कादंबरीतून सर्वांना अनुभवायला मिळते

View full details