Ganam
Babhulmaya By Vikas Gujar
Babhulmaya By Vikas Gujar
Couldn't load pickup availability
या कादंबरीत एका शेतकरी वडिलाबद्दल, एका बापाबद्दल लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्यासाठी स्वतःचं आयुष्य वेचणाऱ्या बापाचं वास्तविक जीवन उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. आईबापचं नातं आणि तारुण्यातील प्रेम यातील फरक दाखवण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे. तारुण्यातील सळसळत्या रक्तातसुद्धा कोणतेही पाऊल उचलण्याआधी प्रत्येकानं आपल्या बापाचा विचार करावा, त्याच्या पडद्याआड लपलेल्या मातृरुपी भावनांचा विचार करावा हे मांडण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकात केला आहे.
इवल्याश्या परट्यासाठी आणि -पिलांसाठी ज्यानं भोगल, ज्याने सोसले, नाना म्हणून त्याचं जगणे लवकर नाही कळत. तो लढतो, हारतो, अश्रू पुसतो, तरीही पुन्हा चालतो. पिकलेल्या केसात अन् या दुनियेतील नामळीसारख्या काट्यात पिलांसाठी तो बाभूळमाया जपतो. अशा बापाबद्दल मुलाची संवेदना व्यक्त करणारी कादंबरी.
ही कादंबरी प्रत्येक शेतकऱ्याची, त्याच्या जगण्याची, मुलांना घडवण्याची आणि त्यांनं त्याच्या आयुष्यात मुलांसाठी केलेली जीवघेणी तडजोड यांचीच आहे. बाभूळमाया ही एका बापाचं मन सांगणारी आहे. शेतकरी बापाची माया आणि एक बाप म्हणजे काय ? हे सांगणारी कादंबरी नक्की वाचावी अशी आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.