Ganam
Ba Tathagata By M. S. Pagare
Ba Tathagata By M. S. Pagare
Couldn't load pickup availability
माणसाच्या संस्कारित होण्याचे केंद्रवर्ती सूत्र घेऊन खऱ्या अर्थाने अस्सल संस्कृतीचे संवर्धन कसे होईल? असा प्रश्न निर्माण झाल्यास त्या प्रश्नाच्या उत्तरात ‘बुद्धिस्ट फिलॉसॉफी’ ही सर्वार्थाने प्रभावी ठरणारी शिकवण आहे असे लक्षात येते.
‘बा, तथागता!’ हे महाकाव्य छंदोबद्ध नाही. ते मुक्तछंदातील आहे. सहज आकलन व्हावे यासाठी ते तीन आविष्करणांमधून वाचकांसमोर ठेवले आहे. या तीनही आविष्करणांमध्ये संवादशैली वापरलेली आहे.
पहिल्या आविष्करणात प्रातिनिधिक माणूस नजरेसमोर ठेवून त्याच्याशी संवाद साधला आहे.
दुसऱ्या आविष्करणात ‘तथागतां’सोबत संवाद साधला आहे. त्यांच्या प्रत्येक शिकवणुकीचा माणसाशी असणारा अनुबंध कशा पद्धतीचा आहे याचे आकलन या संवादातून होते.
तृतीय आविष्करणात माणूस आणि मानवताविषयीचे चिंतन केले आहे.
समारोपात महाकारूणिकाला त्याच्या संस्कारपूर्ण मानवतेसाठीच्या शिकवणुकीसाठी अभिवादन केले आहे.
वाचकांना प्रेरणा मिळावी, मानवतावादी संस्कृतीच्या प्रवासाला बळ मिळावे म्हणजे या विशाल काव्याच्या माध्यमातून लोककल्याणासाठीचा प्रवास सुरू राहील अशी कवीची केंद्रवती भूमिका आहे.
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.