Ganam
Atmaprakash By Sanjay Arvikar
Atmaprakash By Sanjay Arvikar
Couldn't load pickup availability
आत्मपर लेखनातून कथनकर्त्याच्या अंतरीचा प्रकाश वाचकांपर्यंत पोचत असतो. आपल्या चुकांची कबुली देणारे महामानव/कलावंत/चिंतक/तत्त्वज्ञ अशा कथनांमधून वाचकांसाठी लहान होत नसतात तर, सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे
जाणारी एक प्रकाशवाट आपल्या साक्षीनं उजळून निघाल्याचं वाचक हे वाचताना अनुभवत असतो. त्यांच्या आयुष्यात येणारे सर्जनाचे आणि जीवनप्रणालीचे पेच यांचं व्यक्ती-समष्टीच्या जगण्याशी नातं कसं असतं, याचंही दर्शन अशा लेखनातून होत असतं.
कलावंत/चिंतक एकटा पोकळीत घडत नसतो. अवती-भवतीची परिस्थिती, निसर्ग, माणसं, संस्कृती यांतून त्याचं जीवन साकारत असतं. हे लेखन मानवी संस्कृतीच्या दृष्टीनं महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
समाज, नैतिकता, मानव्य, सर्जनशीलता, कलावंताची प्रतिसृष्टी, त्याच्या सर्जनाचे पेच, चिंतकानं शोधलेल्या नव्या वाटा, त्याचे आस्थाविषय याचंही प्रतिबिंब अशा लेखनात पडलेलं दिसतं. आत्मपर लेखनात ‘स्व’ केंद्रस्थानी असला तरी ‘पर’ (इतर) सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असतात.
‘स्व’च्या जडण-घडणीत ‘पर’चं अस्तित्व कुंभकारासारखं असतं. या ‘पर’चा चेहरा पाहण्याचा प्रयत्न ‘आत्म-प्रकाश’मधील लेखांमध्ये केला आहे.
आत्म-प्रकाश । संजय आर्वीकर
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.