Ganam
ANIL by MANE LAXMAN
ANIL by MANE LAXMAN
Couldn't load pickup availability
लक्ष्मण माने यांनी अनिल अवचट यांचं व्यक्तिमत्त्व या पुस्तकातून उलगडलं आहे. लक्ष्मण माने यांचा अनिल अवचटांशी झालेला परिचय आणि उत्तरोत्तर दृढ होत गेलेला स्नेह...माने आणि अवचट कुटुंबाची एकरूपता... अनिल अवचटांनी ‘उपरा’ लिहिण्याची दिलेली प्रेरणा आणि उपराच्या प्रकाशनापर्यंत आणि प्रकाशनानंतरही प्रत्येक बाबतीत केलेली मदत...सफाई कामगारांना मैल्याच्या पाट्या उचलायला मदत करणारा अनिल...वारीमध्ये अस्पृश्यांच्या दिंड्यांना बेदखल करणार्यांच्या विरोधातील चळवळीत बेधडकपणे उतरणारा अनिल...मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत उडी घेऊन तुरुंगात जाणारा अनिल...माने यांचा अपघात आणि त्यांच्यावर आलेल्या ‘किटाळ’ प्रसंगी खंबीरपणे पाठराखण करणारा अनिल...सुनंदा आणि अनिलचं एकरूप सहजीवन...अनिलचं सुखी कौटुंबिक जीवन...मुक्तांगणचा संस्थापक समाजसेवक अनिल, चित्रकार, बासरीवादक अनिल, चिंतक अनिल, मित्र अनिल...अशी अनिल अवचटांची विविध रूपं साकारणारं हे पुस्तक
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.