Ganam
Ani Tareehi Mee By Saumitra
Ani Tareehi Mee By Saumitra
Couldn't load pickup availability
सौमित्र यांची कविता नितान्त गांभीर्याने लिहिली गेलेली आणि अनुभवाच्या उत्कटतेतून निर्माण झालेली कविता आहे. हे अनुभव जाणवण्यातून त्याचे स्वतः से असे काही वेगळेपण आहे आणि ते वेगळेपण जाणून घेऊन ते कलात्मक रीतीने व्यक्त करण्याचे कौशल्यही सौमित्र याच्याजवळ आहे. कॅमेन्याने एखाद्या घटनेचे शूटिंग करावे त्या पद्धतीने अनुभव टिपणे, नाट्यप्रवेशाच्या घडणीच्या माध्यमातून एखादा काव्यानुभव उभा करणे किंवा अनुभवाकडे पोर्ट्रेट चित्रणाच्या दृष्टीने पाहणे अशा आगळ्यावेगळ्या पद्धतींनी त्यांच्या काही कविता साकारलेल्या दिसतात पण अशा काही मोजक्या कविता वगळता बाकांच्या कवितात त्यातील अनुभवानुसारच त्या त्या कवितांची अभिव्यक्ती पडलेली आहे. यातून या कवितांचे स्वतंत्रपण मनावर उसते.
सौमित्र यांचे कवितेसंबंधीचे प्रेम आणि तिच्याशी असलेले त्यांचे प्राणाइतके जवळचे नाते त्याच्या अनेक ओळीतून प्रकटले आहे. त्याचबरोबर त्याच्या कवितांत एकरूपतेने मिसळून गेलेले अनेक चोर चित्रकार, लेखक, कवी यांचे संदर्भ पाहिले की विविध कलासंबंधी जागरूक असलेल्या कवी सौमित्र यांच्या कलात्मक व्यक्तिमत्त्वाची ओळख पटते.
शंकर वैद्य
Share

Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.