Ganam
ANGAT PANGAT By D.M.MIRASDAR
ANGAT PANGAT By D.M.MIRASDAR
अंगतपंगत’ हे द. मा. मिरासदार यांचं विनोदी ललित लेखांचं पुस्तक आहे. वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले हे लेख हसवतात आणि अंतर्मुखही करतात. कोटी (शाब्दिक), लेखनासंबंधीचं मार्गदर्शन, व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी लागणारी माणसाची पात्रता, लायकी, भुताखेतांच्या गोष्टी, भविष्याचा नाद, नाव (माणसाचं), सत्याविषयीचं भाष्य, पोकळ देशभक्ती, व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, मास्तरांची बाजू, गुरुजींच्या विविध तऱ्हा, संपादक पद, स्वप्नं, फाशी, मंदिर, स्मशान, वेड अर्थात ध्यास, देवपूजा, खानावळ, व्यायामाची तालीम, कुत्रं–मांजर, डॉक्टर, सामान्य माणसं, देशी हॉटेल, गाढव-माकड, लढाई, न्हावी इत्यादी विषयांवर मिरासदारांनी त्यांच्या खास खुमासदार शैलीत लेख लिहिले आहेत. अर्थातच ते विनोदी अंगाने लिहिलेले आहेत. त्यांचे उपहासात्मक विनोद वाचकाला खळखळून हसवतात. हे लेख रंगतदार किस्से आणि आठवणींमुळे रंजक झाले आहेत. एकदा वाचायला घेतल्यावर हे पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेववत नाही. तेव्हा हे वाचनीय विनोदी पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे आणि त्यातील किश्श्यांमधून निर्माण होणाऱ्या विनोदाचा आस्वाद घेतला पाहिजे.
Share
Subscribe to our emails
Be the first to know about new collections and exclusive offers.